InfoWorldMarathi IAS Ansar Shaikh
IAS अंसार शेख
            
            भारतातील बहुतांश मुला/मुलींना किंवा त्यांच्या पाल्यांना जर कोणत्या गोष्टीचे सर्वात जास्त आकर्षण असेल तर ते म्हणजे Government Job! कदाचित तुमचे स्वप्न देखील असेच काही असेल! पण खरं सांगायचं झालं तर सरकारी नोकरी त्यांनाच मिळते, जे प्रमाणिक आणि अखंडपणे प्रयत्न करतात.

            अंसार शेखसुद्धा आपल्या कठीण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर देशातील सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा पास झाला आणि IAS बनला. त्याचीच ही कहाणी... 

IAS अंसार शेख याचा जीवनप्रवास :  

            १ जून १९९५ रोजी महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यामधील शेलगाव ह्या छोट्याशा गावी मुस्लिम कुटुंबामद्धे एका मुलाचा जन्म झाला. त्याच्या वडिलांनी त्याचे नाव “अंसार” असे ठेवले. अंसारचे कुटुंब हे गरीब म्हणजेच Below Poverty Line (BPL) असल्यामुळे त्याचे वडिल Auto-Rickshaw चालवून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. घरी गरीबी असली तरीही त्याच्या वाडिलांनी आपल्या मुलाचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून नेहमीच प्रयत्न केले.

            पण एक दिवस त्यांच्याच समाजातील एका व्यक्तीने त्यांना एक सल्ला दिला. तो व्यक्ती म्हणाला, “इसको (अंसारला) पढाकर कौनसी नौकरी लगने वाली है| अब तो सरकारी नौकरी बची ही नहीं। और तो और हमारे समाज के लोगो को सरकारी नौकरियाँ मिलती नहीं और हमें कोई नौकरी देता भी नहीं| इसको कही काम पे लगा दो घर में थोड़े पैसे आ जायेंगे”| 

            घराची परिस्थिती पाहता अंसारच्या वडिलांना त्या इसमाचा सल्ला पटला आणि ते थेट त्याच्या शाळेत पोहोचले व शिक्षकांना आपल्या मुलाचे नाव शाळेतुन काढून टाकण्याची विनंती करू लागले. खर तर अंसारच्या वडिलांचे हे वागणे पाहून शिक्षकांना आश्चर्यच वाटले. कारण अंसार हा अभ्यासात खुप हुशार होता आणि त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी ते आपल्या मुलाचे नाव शाळेतुन कमी करू इछित होते.

            अंसारचे शिक्षक पुरुषोत्तम पडूळकर हे त्याच्या वडिलांना एव्हढच म्हणाले की, “पैशाचाच प्रॉब्लम असेल तर आम्ही त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. पण त्याला शिकू दया!” 

            पैशाच्या अभावामुळे अंसारचे वडिल आपल्या मुलाचे नाव शाळेतून काढण्यास निघाले होते. पण आता  शिक्षकांनीच आर्थिक मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला. परिस्थितचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरुषोत्तम पडूळकर सरांनी त्या वेळी अंसारच्या वडिलांना समजावले नसते तर आज कदाचित अंसार शेख IAS झालाच नसता!

            शिक्षणाची संधी मिळताच अंसार आता अधिक जोमाने अभ्यासाला लागला. सर्वकाही सुरळीत चाललं होत. त्यांचे घरकुल सुद्धा मंजूर झाले होते. पण घरकुलाची रक्कम मिळण्यास खुप उशीर होत होता. कारण संबंधित अधिकारी त्याच्या वडीलांना मिळणाऱ्या रकमेच्या १०% रक्कम लाच म्हणून मागत होता. गरिबासाठी घर ही खुप मोठी गोष्ट असल्याकारणाने त्यावेळी अंसारच्या वडिलांनी मोठ्या खाटापटीने रु.३००० जमवून त्या भ्रष्ट अधिकार्यास दिले. हीच गोष्ट अंसारच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली आणि त्याने एक चांगला शासकीय अधिकारी बनण्याचा निश्चय केला!

            दिवसांमागुन दिवस गेले आणि १० वीची परीक्षाही संपली. एक दिवस वर्तमानपत्र वाचत असतांना त्याचे शिक्षक मापारी सरांनी MPSC परीक्षा पास केल्याबद्दलची बातमी त्याच्या नजरेस पडली. ती बातमी वाचून अंसार थेट मापारी सिरांकडे गेला आणि MPSC परीक्षेबद्दल विचारणा करू लागला. सरांनी त्याला MPSC आणि UPSC ह्या दोन्ही परीक्षांबद्दल संपूर्ण माहिती सांगितली.

            सरांच्या मार्गदर्शनाने त्याला आनंदही झाला आणि दुःखही. आनंद ह्यासाठी की त्याला त्याचा मार्ग मिळाला होता आणि दुःख ह्यासाठी की त्यासाठी लगाणाऱ्या पैशांचे काय करायचे? हा भीषण प्रश्न त्याच्यासमोर “आ” वासून उभा राहिला होता. परंतु त्याच्या वडिलांनी आणि भावाने पैशाची चिंता न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्याला दिला आणि पुढच्याच क्षणी अंसारने UPSC करण्याच्या उद्देशाने थेट विद्येचं माहेरघर पुणे गाठले.

            त्याच्या वडीलांना आपला मुलगा नेमक काय शिक्षण घेत आहे याची काहीही कल्पना नव्हती. पण तो काही तरी मोठ करतोय याची खात्री मात्र त्यांना नक्कीच होती. त्याचा भाऊ जो वयाने त्याच्याही पेक्षा लहान होता, केवळ आपल्या भावाचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून आपले शिक्षण सोडून त्यांच्याच एका नातेवाईकांकडे काम करू लागला आणि त्याची आई तर इतरांच्या शेतात मोल मजूरी करुन मिळालेले पैसे त्याच्या शिक्षनासाठी बचत करू लागली.

            आई, वडिल आणि भाऊ यांच्या कष्टाची जाणीव अंसारला होतीच पण त्यांचे अपर कष्ट पाहून त्याला खुप दुःख होत असे. पण कदाचित परिस्थितीच्या या जाणीवेमुळेच तो अधिक जोमाने अभ्यासही करू शकत होता. आपल्यासाठी नाही तर किमान दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी आपण IAS बनायचच! असा ठाम निर्धार करुन तो जीव तोडून अभ्यास करू लागला.

            आणि अखेर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या कष्टाचे चीज झाले. २०१६ मद्धे अंसार शेख पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. संपूर्ण भारतात त्याची रैंक ही ३६१ वी होती. अंसार शेख आता IAS अंसार शेख बनला होता!
 



#InfoWorldMarathi   #IASAnsarShaikh   #MotivationalStory