जगभरामद्धे मृत्यूचे थैमान घलाणाऱ्या कोरोना व्हायरसला
रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्या धरतिवरच संपूर्ण
भारतातही लॉकडाउन करण्यात आले असुन महाराष्ट्रात कलम १४४ लागु करण्यात आले आहे.
काय आहे कलम १४४?
CrPC 144 अनुसार कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागु करण्यात येते. या कलमानुसार संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश सरकार देऊ शकते. त्यामुळे लोकांच्या सार्वजनिक जीवनातील हालचालींवर बंधने येतात.
जमावबंदी म्हणजे नेमकं काय?
संचारबंदी म्हणजे नेमकं काय?
संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू! सहसा दंगे, लूटमार, मारामारी होऊ नये किंवा ह्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागु करण्यात येत असते. संचारबंदी दरम्यान कुणालाही पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय घराबाहेर पडता येत नाही.
राज्य सरकार संचारबंदी कमीत-कमी २ आणि जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत किंवा अनिश्चित कालावधीपर्यंत वाढवू शकते आणि परिस्थिती आटोक्यात येताच संचारबंदी शिथिलही करू शकते. पण अत्यावश्यक सेवा जसं की, अन्नधान्य, दूध, औषध, आरोग्य समस्या ई. मात्र सुरु ठेवण्यात येतात. या गोष्टींसाठी आपण बाहेर पडलात तर तसे कारण किंवा पुरावे वेळेप्रसंगी पोलिसांना तुम्हाला द्यावे लागतील. अन्यथा आपल्यावर करवाई सुद्धा होऊ शकते.
शिक्षा काय?
संचारबंदी दरम्यान बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीला एक तर पोलिस समाज देऊन सोडू शकतात किंवा अटक करू शकतात. अटक झालेल्या व्यक्तीला दंडासहीत १-६ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Comment Box मद्धे आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेख Share करायला नका. धन्यवाद!
#InfoWorldMarathi
0 Comments