डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याने ११ अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेने यावर शिक्कामाेर्तब केले.
काही विभाग इतर विभागात विलीन केले आहेत, तर ५ शैक्षणिक वर्षामध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत. विभागप्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमद्धे, एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अँड आर्ट अँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अँड जीए) आणि एमएस्सी नॅनो टेक्नॉलॉजी ई. समावेश आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४ नवीन कोर्स सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. त्यांमद्धे, एमएस्सी इन फॉरेन्सिक सायन्स, एमएस्सी इन आर्टीफिशियल इन्टेलिजन्स, एमएस्सी इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग आणि डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) ई. अभ्यासक्रमांकाचा समावेश करण्यात आला आहे.
बंद करण्यात आलेल्या किंवा नवीन सुरु केलेल्या कोर्स बद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही 0240-2403399, 2400431 या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकता.
#InfoWorldMarathi #BAMU #DrBabasahebAmbedkarMarathwadaUniversity
0 Comments