रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने प्रवाशांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ट्रेनमद्धे लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना वाढत असल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशनसुद्धा जरी केले आहे. ते असे_
रेल्वेने ट्विट करत म्हटले आहे कि, ट्रेनमद्धे प्रवासादरम्यान प्रवाशांनी ज्वालाग्राही साहित्य (केरोसीन, सुके गावात, स्टोव्ह, पेट्रोल, गॅस सिलेंडर, माचीस, फटाके किंवा आग पसरवणार्या कुठल्याही वस्तू) सोबत ठेऊ नये आणि कुणालाही सोबत घेऊन जाऊ देऊ नये, हा एक दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे कायदा, 1989 चे कलम 164 च्या अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असून अशा व्यक्तीला ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
याशिवाय आगीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने बनवलेल्या योजनेंतर्गत जर कुणी स्मोकिंग करतांना पकडला गेला तर त्यास ३ वर्षापर्यंत कारावास सुद्धा होऊ शकतो. शिवाय दंड सुद्धा भरावा लागू शकतो. रेल्वे परिसरात सिगरेट/विडी पिणे दंडनीय गुन्हा आहे.
#InfoWorldMarathi #IndianRailways
0 Comments