आजकाल देशामद्धे सायबर क्राईमच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामद्धे प्रामुख्याने बँकेच्या नावाने मेसेज पाठवून लोकांना गंडा घालण्याचे प्रमाण सर्वात जास्त असून असाच एक मेसेज आजकाल SBI ग्राहकांना मिळत आहे.
या मेसेजमद्धे, SBI ग्राहकांना त्यांचे Yono App अकाउंट ब्लॉक झालं आहे असं सांगण्यात येते आणि Pan Card अपडेट करण्यासाठी सोबत एका वेबसाईटची लिंक दिली जाते. ही लिंक SBI बँकेच्या वेबसाईटशी अगदी मिळती-जुळती आहे. पण ती SBI ची अधिकृत वेबसाईट नसल्याने जर कोणी त्या लिंकवर क्लीक केलं तर त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
अशा आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. SBI किंवा ईतर कुठलीही बँक आपल्या ग्राहकांना त्यांचा युजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन नंबर, सिविवि(CVV) नंबर सारख्या पर्सनल आणि बँकिंग डिटेल्स एखादी लिंक पाठवून किंवा कॉल, एसएमएस, ई-मेल करून विचारात नाही. त्यामुळे जर तुम्हाला असा मेसेज मिळाला असेल तर कोणत्याही लिंकवर क्लीक न करता सर्वात आधी तुम्ही 155269 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करू शकता किंवा तुम्ही report.phishing@sbi.co.in वर मेल सुद्धा करू शकता.
#InfoWorldMarathi #SBI #SBIYonoApp #PanCard
0 Comments