भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने म्हटले आहे कि एटीएममद्धे पैसे संपणार नाहीत याची खात्री संबंधित बँकांना करावी लागेल. यासाठी बँका आणि WLAO कंपन्या ज्यांच्या माध्यमातून ATM मद्धे पैसे टाकले जातात या दोघांनाही आता वॉच ठेवावा लागेल.
एव्हढंच नाही तर पैसे संपल्यानंतर एटीएममद्धे रोख रक्कम जमा करावी लागेल, जेणेकरून जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
नियमानुसार, महिन्यामद्धे १० तासांपेक्षा जास्त एटीएममद्धे पैशांची कमतरता असू नये. यापेक्षा जास्त वेळ बँकांना लागत असेल तर त्यांना रु.१०,००० दंड भरावा लागेल. हा नियम १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होईल.
जर तुम्ही सुद्धा एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि एटीएममधील कॅश संपली असेल तर आता तुम्ही थेट रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर किंवा फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवर तक्रार करू शकता किंवा 011-23711333 या फोन नंबरवर कॉल करूनही तक्रार करू शकता.
#InfoWorldMarathi #RBI #RBIDecisionDryATMs
0 Comments