पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही आठवडयामद्धे व्हिडिओ कॉन्फरेन्स द्वारे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा ९ वा हफ्ता जारी केला होता. ९ व्या हफ्त्यात सरकारने जवळपास १९,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट ९.७५ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली होती.
तुम्ही सुद्धा किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि काही कारणांमुळे तुमच्या खात्यात ९ व्या हफ्त्याचे पैसे आले नसतील तर अस्वस्थ होण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान योजनेच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरून योजनेशी संबंधित कोणतीही तक्रार दाखल करू शकता किंवा तुमचे पैसे नेमके कोणत्या कारणामुळे अडकले आहेत याची माहिती मिळवू शकता.
पीएम किसान योजनेचे हेल्पलाईन नंबर्स असे आहेत,
१) 1800115526
२) 155261
३) 011-24300606/23381092
या तिन्हीं पैकी कुठल्याही हेल्पलाईन नंबर वर कॉल करून तुम्ही तुमच्या तक्रारींचे निवारण करून घेऊ शकता. पण यदाकदाचित तसे झाले नाही तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर ई-मेल सुद्धा करू शकता.
#infoworldmarathi #pmkisanscheme #pmkisanschemehelplinenumbers
0 Comments