InfoWorldMarathi

            कोरोना व्हायरसने पृथ्वीतलावरील जवळपास सर्वच देशांत आपले पाय पसरले आहेत आणि आपल्या मृत्युरूपी तांडवणे त्याने संपूर्ण मानव जातीला अगदी भयभीत करुन सोडले आहे. त्याचधर्तीवर अशा या भयावह स्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी आपल्यासाठी ह्या काही टिप्स_

माहिती विश्वासार्ह स्त्रोतांकडून मिळवा :

InfoWorldMarathi

            आजचे युग हे माहितीचे युग आहे आणि इंटरनेटमुळे तर दर मिनीटाला आपल्याला माहिती मिळत असते. पण प्रमाणिकपणे सांगायचे झाले तर आजकल अफवाच जास्त पसरवल्या जातात आणि जेव्हा सत्य आपल्यापर्यत पोहोचते तेव्हा मात्र खुप उशीर झालेला असतो.

            म्हणून आपल्यापर्यत मिळत असलेली माहिती ही विश्वासार्ह स्त्रोतांकडून मिळत आहे की नाही ह्याची प्रत्तेकाने शाहानिशा करणे फार गरजेच आहे. COVID19 बद्दल अचूक माहिती मिळवण्यासाठी आपण WHO म्हणजेच World Health Organization आणि CDC म्हणजेच Centers for Disease Control ह्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

मर्यादित न्यूज़ पहा :

InfoWorldMarathi

            COVID-19 बद्दल माहिती घेण हे उत्तमच आहे. पण त्याच विषयाची वारंवार माहिती घेणे अजिबात चागलं नाही. कारण त्यामुळे आपणास भीती किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. सोशल मिडियावरुन मिळणाऱ्या माहितीपासून तर आपणास विशेष सावध राहण्याची गरज आहे. कारण बहुतांश अफवा ह्या व्हॉट्सॲप, फेसबुक द्वारेच पसरतात.

            दिवसभर बातम्या पाहण्यापेक्षा आपण एकदा सकाळी आणि दुसर्या वेळेस रात्रीच्यावेळी बातम्या पाहु शकता. त्याने आपण अपडेटही राहाल आणि कोरोना व्हायरस बद्दल आपणास भीतीही वाटणार नाही.

बहुतेक प्रकरणे सौम्य असतात आणि बरेच लोक बरे होतात या गोष्टीवर लक्ष द्या :

InfoWorldMarathi

            चीन, इटली सारख्या देशात कोरोनाने घातलेल्या मृत्युच्या थैमानाने आपले घाबरणे साहजिक आहे. परंतु ह्यांपैकी ८०% केसेस अगदी सौम्य आहेत. हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे. 
आणि जे ह्या व्हायरसला बळी पडले होते त्यांपैकी बहुतांश व्यक्ति ह्या पूर्णपणे बऱ्या झाल्याच्या घटनाही आपण पाहत आहोतच. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही हे स्पष्ट होते.

            COVID-19 च्या रुग्नाला खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास म्हणजेच फ्लू झाल्या सारखी लक्षणे दिसून येतात. पण लहान मुलांना ह्या व्हायरस पासून खुप कमी धोका आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना नियमित स्वच्छ हाथ धुण्याची सवय लावून आपण त्यांना ह्या आजरापासून दूर ठेऊ शकता.

            भारत सरकारने २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय ह्याच साठी घेतला की जे कोरोना बाधित रुग्ण आहेत ते अधिक प्रमाणात वाढू नये आणि नविन रुग्ण तयार होऊ नये. त्यामुळे श्यक्यतोवर घराबाहेर पडू नका.

आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांना उपयोगी माहिती पाठवत रहा :

InfoWorldMarathi

            आजकल कोरोना व्हायरस ने तसेही मानव जातीला अगदी घाबरून सोडले आहे. त्यामुळे आपल्याला COVID-19 वद्दल विश्वासार्ह उपयोगी माहिती असल्यास आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर किंवा ईमेल, एसएमएस द्वारे पाठवू शकता. जेणेकरून त्याच्या मनातील भीती तुम्ही दूर करू शकाल.

            योग्य आणि अचूक माहिती ही अनेकांना या व्हायरस बद्दल लढण्याची प्रेरणा देऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. कुणी अफवांचा प्रसार करत असेल तर त्यांना WHO ने नेमक काय सांगितलं हे त्यांना आपण सांगु शकता. म्हणजे त्यांच्या माहितीत भरही पडेल आणि अफवा पसरणार नाहीत.

            तर ह्या त्या ४ टिप्स आहेत ज्यांचा उपयोग आपण कोरोना व्हायरसच्या दहशतभऱ्या वातावरणात स्वतःस शांत ठेवण्यास करू शकता. आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Comment Box मद्धे आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेख Share करायला नका. धन्यवाद!


#InfoWorldMarathi