InfoWorldMarathi

            कुठल्याही आजराशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ति महत्वाची भूमिका बजावत असते. आपली रोगप्रतिकारक शक्ति मजबूत असेल तर आपण कोरोना व्हायरसवर सुद्धा मात करू शकता. त्याच धर्तीवर आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी ह्या काही टिप्स_         

जास्तीत जास्त फळे आणि भाजीपाला खा :

InfoWorldMarathi

            फळे आणि भाजीपाल्यांमद्धे मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे आणि पोषकतत्वे असतात. उदा. “अ” जीवनसत्व आणि “क” जीवनसत्व ई. त्यांच्यामद्धे अँटीऑक्सीडेंट पण भरपूर असतात ज्यामुळे शरीरातील ऑक्सीजन वाढण्यास मदत मिळते.

            त्याचप्रमाणे गाजरलसूण आणि पालक यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि "ई" जीवनसत्व असते. बेरी आणि संत्री ह्यांसारख्या फळांमद्धे “अ” जीवनसत्व भरपूर असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ति सुरळीत काम करत असते.
 

भरपूर पाणी प्या :   

InfoWorldMarathi

            भरपूर पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढत जाते. एव्हढच नाही तर पाणी आपल्या रक्तातील विषारी द्रव्य शरीरा बाहेर टाकते आणि अन्नाचे पचन करण्यास मदतही करते. पाण्यामुळे शरीरात लसीका (Lymph) तयार होतात. ज्या आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी वाहून नेण्याचे काम करत असतात. पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातील आजारपणाशी लढतात.

            आपले शरीर, आपल्या डोळ्यांना आणि शरीरला स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करत असते आणि रोगास कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही सूक्ष्मजंतूंना दूर ठेवते.

Eat Plenty of Yogurt / भरपूर दही खा :

InfoWorldMarathi

            दही आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतात आणि सर्दीविरूद्ध लढायला मदतही करतात.

            परंतु, हे लक्षात असू द्या कि, डेअरी उत्पादने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी हानिकारक असू शकतात, म्हणून जास्त दूध आणि चीज खाऊ नका.    
  

जेवणात प्रथिनांचा समावेश करा :

InfoWorldMarathi

            अंडी, मासे आणि शेल फिश यांसारख्या पदार्थांमध्ये संपूर्ण प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. हे प्रथिने आपल्या शरीरात एमिनो असिड तयार करण्यात मदतही करतात.

            चरबीयुक्त प्रथिने (Fatty Proteins) आणि लाल मांस (Red Meat) यांपेक्षा हे प्रोटीन आपल्या शरीरासाठी कधीही चांगले आहे. 

संपूर्ण धान्य खा :

InfoWorldMarathi

            ओट्स आणि बार्ली हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना तर देतातच पण आपल्या प्रतिजैविकांना (Antibodies) ना सुद्धा अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करतात. 

            संपूर्ण धान्यांमद्धे (Whole Grains) बेंझोक्झाझिनॉइड्स (Benzoxazinoids) किंवा बीएक्स (BX) हा घटक असतात, जो आपल्या शरीरातील घातक जीवाणूंचा नाश करून आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यास कारणीभूत असतो. 

गोड पेये पिणे टाळा :

InfoWorldMarathi

            कृत्रिमरित्या गोड केलेला रस आणि कोलासारखे ही पेये पाण्यासारखे नाही तर अन्नासारखे कार्य करतात आणि पचनानंतर उर्वरित कचरा काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. म्हणजेच ही पेये आपल्याला निर्जलीकरण (Dehydrate) करत असतात.

            साखरयुक्त पेये आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेत बिघाड करू शकतात. कारण अतिरिक्त साखर आपल्या रक्तप्रवाहात पोहोचुन रक्तातील पांढर्या पेशीविरूद्ध कार्य करायला लागतात. त्यामुळे गोड पेये टाळाच!

मद्यापासून दूर राहा : 

InfoWorldMarathi

            मद्यपान आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस अडथळा निर्माण करू शकते. विशेषत: आपण आधीच आजारी असताना ते जास्त घटक ठरू शकते. एव्हढंच नाही तर तीव्र मद्य (Strong Alcohol) चा वापर केल्यास दीर्घकालीन रोग देखील उद्भवू शकतात. 

            पण दररोज एखादा ग्लास रेड वाईन सारख्या अल्कोहोलचा वापर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतो हे हि तितकेच खरं. 

            तर ह्या आहेत त्या ७ टिप्स, ज्यांचा वापर करून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करू शकता. आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Comment Box मद्धे आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेख Share करायला नका. धन्यवाद!  


#InfoWorldMarathi