InfoWorldMarathi

            जगभरामद्धे कोरोना व्हायरस ने अक्षरशः थैमान घातला आहे. यूरोप, चीन, अमेरिका, इटली, जर्मनी, भारत, ईरान या व अशा अनेक बलाढ्य देशातील लोक ह्या जीवघेण्या व्हायरसच्या वीळख्यात अडकले आहेत. नवखा व्हायरस असल्या कारणाने शास्त्रज्ञांनासुद्धा ह्यावर लस बनवण्यात अजुन यश आले नसले तरी प्रतिबंद हाच उपाय असे त्यांनी सांगितले आहे. त्याधर्तिवरच हे ७ उपाय आपल्यासाठी_  

ईतर व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवा :

InfoWorldMarathi

            आज काल "Social Distancingहा शब्द रोज आपल्या कानावर टिव्ही बघतांना किंवा रेडिओ ऐकतांना पडतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इतर व्यक्तींपासून आपणास सुरक्षित अंतर ठेवायचे आहे असा त्याचा अर्थ होतो. कदाचित आपल्याला आता हा प्रश्न पडत असेल की नेमकं किती अंतर ठेवायचे? 

            तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तींशी किमान एक मीटर किंवा साधारणतः तिन फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे. किंबहुना घराबाहेरच पडू नये म्हणजे आपणांपासून इतरांना आणि इतरांकडून आपल्याला संसर्ग होणार नाही. प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा फोन करुन किंवा व्हिडिओ कॉल करुन अथवा सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवारांसोबत संपर्कात राहू शकता. 

            एव्हढच नाही तर घरी राहुन तुम्ही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता, विविध खेळ खेळू शकता, चित्रपट बघू शकता, आपला छंद जोपासू शकता किंवा कहीतर नविन शिकू शकता. जेणेकरून तुमचा हा वेळ सत्कर्मी लागेल.

नियमित हात धुवा :

InfoWorldMarathi

            कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर नियमित आणि व्यवस्थित हात धुणे कधीही चांगले! बाहेरून आल्यानंतर, जेवण बनवण्याआधी, जेवणाआधी आणि जेवणानंतर आपले हात धुणे अनिवार्य आहे. हात धुण्यासाठी कोमट पाणी आणि साबणाचा किंवा Sanitizer चा वापर करा. 

            कमीत कमी २० सेकंद हात धुणे कधीही योग्य! आपला तळ हात, हाताचा पठिमागिल भाग आणि बोटांमधील भागही स्वच्छ धुणे अनिवार्य आहे. हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ अशा टॉवेलने हात पुसावे. आपण Hand Dryer चा सुद्धा वापर करू शकता, पण एव्हढ लक्षात घ्या की Hand Dryer ने कुठलाही व्हायरस मरत नाही!

आपल्या हाताने डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका :

InfoWorldMarathi

            बहुतांश व्हायरस आणि अगदी COVID-19 सुद्धा मानवी शरीरात आपल्या डोळे, नाक आणि तोंड यांमधुनच प्रवेश करत असतो. त्यामुळे वारंवार आपल्या चेहऱ्याला हाथ लावणे टाळा. 
चेहऱ्याला हाथ लावायचा असेल तर आधी साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरने हाथ स्वच्छ धुऊन घ्या.

आजारी व्यक्तींपासून दूर राहा :

InfoWorldMarathi
                     
            जर कुणाला खोकला, सर्दी झाली असेल तर अशा लोकांपासून कमीत कमी सहा फुट म्हणजेच जवळपास दोन मीटर अंतर दूर रहा. त्यामुळे आपणास ह्या रोगांचा संसर्ग होणार नाही. कुणी वारंवार खोकलत असेल म्हणजे त्या व्यक्तीला कोरोना झाला असा गैरसमज करून घेऊ नका. कारण जोपर्यंत त्याची टेस्ट होत नाही तोपर्यंत त्याला कोरोना आहे कि नाही हे निश्चित सांगता येत नाही

            नाईलाजाने अशा व्यक्तीची भेट झालीच तर त्यांच्या भेटीनंतर आपले हाथ स्वच्छ धुवा. पण शक्यतोवर अशा आजारी व्यक्तींपासून दूर राहणे कधीही योग्यच!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या :

InfoWorldMarathi


            आपण प्रत्तेकानेच जर आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्या आजारी पडण्याचे प्रमाण खुप कमी असेल. त्यासाठी आपण आपल्या आहारात योग्य आणि पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. फळं, भाजीपाला, कडधान्य, अंडी, मच्छी, चिकन इत्यादींचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढेल.

            प्रौढ व्यक्तींनी ७-९ तास तर किशोरवयीन व्यक्तींनी ८-१० तास झोप घेणे अत्यावश्यक आहे. तसेच दररोज किमान ३० मिनिटे तरी व्यायाम करावा. ज्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तित आणखी भर पडेल.

विनाकारण बाहेर फिरू नका :

InfoWorldMarathi

            सध्याच्या स्थितीत गरज नसतांना बाहेर पडणे म्हणजे कोरोना व्हायरसला आमंत्रण देण्यासारखच आहे. त्यामुळे शक्यतोवर घराबाहर जाणे टाळाच! पण एखाद खुपच महत्वाचे काम असेल तर तोंडाला मास्क लावून बाहेर पडा आणि आपल्या बॅगमद्धे अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर जरुर बळगा. वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवत चला.

ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा :

InfoWorldMarathi


            ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही COVID19 ची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आपणास आढळल्यास  त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. आपण ज्या-ज्या ठिकाणी प्रवास केला, कोण-कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आलात ह्याची पूर्ण माहिती डॉक्टरांना दया. गरज भासल्यास डॉक्टर आपल्या काही टेस्ट करतील. जर टेस्ट पॉसिटीव्ह आलीच तर घाबरू नका. पण त्यानंतर मात्र आपल्याला ईतर कोणत्याही माणसाच्या संपर्कात यायचे नाही हे लक्षात ठेवा. 

            योग्यवेळी आणि योग्य ईलाज केल्यास व्यक्ती लवकर बाराही होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्तीत ईलाज करण्यास प्राधान्य द्या! 

            तर हे होते ते ७ उपाय ज्यांच्या मदतीने आपण कोरोना व्हायरसला आपल्यापासून दूर ठेऊ शकता. आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Share करायला आणि Comment Box मद्धे आपला अभिप्राय कळवायला विसरू नका. धन्यवाद!


#InfoWorldMarathi