आपल्या मराठीत एक म्हण आहे, “मूर्ती लहान, पण किर्ती महान”. ही म्हण आजच्या वेळेला South Korea या छोट्याशा देशाला अगदी तंतोतंत लागु पडते. कारण जे America, Spain, Italy ह्या देशांना जमले नाही ते या ईवल्याशा देशाने करुन दाखवले.
दक्षिण कोरिया या देशाची लोकसंख्या साधारणतः ५ कोटि १५ लाख आहे. जेव्हा पहिल्या वेळेस या देशात कोरोनाचा रुग्ण आढळला अगदी तेव्हापासून या देशाने अगदी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले.
त्यामद्धे त्यांनी सुरुवातीला COVID-19 ची टेस्ट करण्यासाठी लॅबचे नेटवर्क बनवले. आजच्या घडीला या देशात ९६ लॅब्स कोरोना व्हायरसची टेस्ट करण्यासाठी सज्ज आहेत.
त्यानंतर त्यांनी ह्या लॅब्सना मोठ्या प्रमाणावर Corona Testing Kits उपलध करुन दिल्या. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट्स ते करू शकतील. आजच्या घडीला या देशात दर दिवशी किमान २०,००० टेस्ट्स केल्या जातात.
एका टेस्टसाठी ५-६ तास लागत असल्या कारणाने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी Corona Test Results फोन करुन किंवा SMS द्वारे सूचित केले जाऊ लागले. विशेष म्हणजे हे सर्व जबाबदारीने आणि शिस्तीत पार पाडण्यात आले.
म्हनुनच कदाचित आज COVID-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दक्षिण कोरियात केवळ ०.७% तर जगाचे मृत्यूचे प्रमाण हे ३.४% आहे!
आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Comment Box मद्धे आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेख Share करायला नका. धन्यवाद!
#InfoWorldMarathi
0 Comments