Bird Flu InfoWorldMarathi

            COVID-
19 शी लढत असतांना, आता त्यामद्धे Bird Flu ची आणखी भर पडली आहे. तसं पाहिलं तर बर्ड फ्लू हा प्रामुख्याने पक्षांमद्धेच आढळून येणारा रोग आहे. पण संक्रमित पक्षांच्या संपर्कात आल्यास, माणसालाही हा आजार ग्रासू शकतो. 


Bird Flu म्हणजे काय?

           


            साधारणतः Bird Flu किंवा Avian Influenza, एक Viral Infection असून, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ते पसरते. वैद्यकीय भाषेत त्याला H5N1 म्हणतात. ज्याप्रमाणे हा Virus पक्षांसाठी प्राणघातक आहे, त्याचप्रमाणे त्याचा धोका माणसाला आणि ईतर सस्तन प्राण्यांनाही आहे.   


Bird Flu माणसांमद्धे पसरतो का?

           

Bird Flu InfoWorldMarathi

            हो. जर एखादा व्यक्ती, संक्रमित पक्षाच्या किंवा त्याच्या विष्टेच्या संपर्कात आला तर त्याला हा आजार होऊ शकतो. उदा. संक्रमित पक्षांची ने-आण करतांना, त्याची स्वच्छता करतांना त्याच्याशी Close Contact मद्धे येणे किंवा अशा पाण्याच्या संपर्कात येणे, ज्यामद्धे संक्रमित पक्षाची विष्टा असेल ई.


Bird Flu एका माणसाकडून, दुसऱ्या माणसामद्धे पसरण्याचा धोका आहे का?

           

Bird Flu InfoWorldMarathi

            सहसा असं होत नाही. पण शक्यताही नाकारता येत नाही. कारण जर एखादा सुदृढ व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या अगदी Close Contact मद्धे आला तर संक्रमण पसरण्याचा धोका उद्भवतो. नाहीतर Casual Contact मद्धे घाबरण्याचे कारण नाही. 


Bird Flu चे माणसांमद्धे कोणती लक्षणे आढळतात?

           

Bird Flu InfoWorldMarathi

            साधारणतः माणसांमद्धे Normal Flu ची लक्षणे आढळून येतात. उदा. ताप (१०० डिग्री पर्यंत), कोरडा खोकलानाक वाहणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास ई. 


Bird Flu वर उपचार उपलब्ध आहेत का?

           

Bird Flu InfoWorldMarathi

            हो. पण वेळीच उपचार केला नाही, तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. म्हणून कोणतही लक्षण दिसल्यास अधिक दिरंगाई न करता दवाखान्यात जाणेच योग्य ठरते, म्हणजे उपचारांती जीव वाचवला जाऊ शकेल.


Bird Flu होऊ नये म्ह्णून काय काळजी घेता येईल?

           

Bird Flu InfoWorldMarathi

            वयक्तिक स्वच्छता बाळगणे, बाहेरून आल्यानंतर वेळोवेळी हात धुणे, संक्रमित पक्षी किंवा मेलेल्या पक्षांपासून लांब राहणे, संक्रमित भागात प्रवेश करणं टाळणे, चिकन-अंडी शक्यतोवर खाणं टाळणे किंवा मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने शिजवून (म्हणजेच किमान ७० डिग्री तापमानावर शिजवून) मगच खाणे ई. नियमांचे पालन केले तरी बर्ड फ्लू चा संसर्ग टाळता येऊ शकतो. 


#InfoWorldMarathi  #BirdFlu #