अभ्यास करणे ही एक कला आहे आणि ती कुणीही शिकू शकते. अगदी तुम्ही सुद्धा! फक्त त्यासाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी लावून घेणे गरजेचे आहे. या लेखामद्धे अभ्यास करण्याच्या अशा काही प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही सुद्धा अभ्यासाच्या कलेत अगदी पारंगत होऊ शकता.
अभ्यास सुरु करण्यापूर्वी काय खबरदारी घ्याल?
अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जसे_
१) अभ्यासाचे साहित्य:
आपले Books, Note-Books, Pens, Pencils, Erasers, Highlighters, Papers ई. अभ्यासाचे साहित्य एका विशिष्ट जागीच ठेवले पाहिजे. जेणेकरून गरज भासल्यास तुम्हाला हे साहित्य लवकर मिळेल. तुम्ही हे साहित्य, एखाद्या टेबलावरही ठेऊ शकता.
जर तुम्ही Online Study करत असाल तर तुम्हाला मिळालेल्या Notes, तुम्ही Google Drive मध्ये Save करू शकता. जेणेकरून पाहिजे तेव्हा ह्या Files तुम्ही सहज मिळवू शकाल. तुमचे Test-Papers तुम्ही एखाद्या Binder किंवा File मद्धे ठेऊ शकता. म्हणजे Revision च्या वेळी ते तुम्हाला सहज सापडतील आणि तुमचा वेळही वाचेल.
२) अभ्यासाच्या वेळेचे नियोजन :
वेळेचं नियोजन करण्याआधी तुम्ही एक काम करा. आधी तुम्ही तुमचा Study Zone शोधा! म्हणजे नेमक्या कोणत्या वेळेला तुम्हाला आभास करायला आवडते, हे शोधून काढा. लक्षात घ्या, Study Zone हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. उदा. कुणाला शाळा/कॉलेज सुटल्यानंतर अभ्यास करायला आवडते, कुणाला रात्री अभ्यास करायला आवडते तर कुणाला सकाळी अभ्यास करायला आवडते. तुमचा Study Zone निश्चित करून त्याप्रमाणेच वेळेचे नियोजन करा.
३) विषयांचे नियोजन :
पूर्ण दिवस एकच विषय वाचणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळे तुम्ही लवकर कंटाळून जाल. एवढंच नाही तर असे केल्याने वाचलेले लक्षात ठेवायलाही अवघड जाते. म्हणून वेळेचे आणि विषयाचे नियोजन व्यवस्थित केले पाहिजे. उदा. मराठी आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्याकडे २ तास आहेत. तर मग तुम्ही मराठीला ४५ मिनिटे देऊ शकता, त्यानंतर १५ मिनिटे ब्रेक घेऊ शकता. त्यानंतर परत ४५ मिनिटे गणिताचा अभ्यास सुरु करू शकता आणि उरलेले १५ मिनिटे केलेल्या अभ्यासाचे Revision करू शकता. म्हणजे तुमचा अभ्यासही होईल, तुम्हाला कंटाळाही येणार नाही आणि तुमची Revision सुद्धा होईल.
लक्षात घ्या. अभ्यास नेहमी अवघड विषयाने सुरुवात केला पाहिजे. कारण अभ्यासाच्या सुरुवातीला तुमची Energy Level ही खूप जास्त असते आणि तुमचा Mind सुद्धा एकदम फ्रेश असतो. त्यामुळे अवघड विषयही सहज समजायला मदत होते.
४) अभ्यासाचे ठिकाण :
अभ्यास करतांना जसं स्वतःचा Study Zone ओळखणं आवश्यक आहे, तसंच ज्या ठिकाणी तुमचे अभ्यासात मन रमते असे ठिकाणही तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. उदा. वाचनालय, तुमची Study Room किंवा ईतर काही.
आणि हो अभ्यासाला बसण्यापूर्वी, आवश्यक असलेले सर्व साहित्य जसे, Books, Note-Books, Pens, Marker ई. आपल्या जवळ ठेवा. म्हणजे तुम्हाला परत-परत उठावे लागणार नाही. अभ्यासादरम्यान Music ऐकण्याची आवड असेल तर त्यात काही गैर नाही पण त्याने तुमचे मन विचलित होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे.
५) मन विचलित करणाऱ्या गोष्टी :
एक लक्षात घ्या, एकाग्रता ही चांगला अभ्यास करण्याची गुरुकिल्ली आहे. आणि ती मिळवायची असेल तर अभ्यास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून चार हात लांबच राहावं लागेल.
एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी तुम्ही एकांतात अभ्यास करू शकता. पण जर ते शक्य नसेल तर तुमच्या आजू-बाजूच्या मंडळींना शांत बसण्याची विनंती करू शकता. अभ्यासाच्यावेळी TV बंद ठेवा आणि Mobile Phone बंद किंवा Silent करा. जेणेकरून तुमचं मन विचलित होणार नाही.
६) घोकंपट्टी नको :
नियमित अभ्यास सोडून परीक्षेच्या किंवा Test च्या एक दिवस आधी घोकंपट्टी करण्याची अनेकांना सवय असते. तुमचे अनेक मित्र या विचित्र पद्धतीने पासही झाले असतील. पण एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्ही आज पास व्हाल, पण भविष्यात तुम्हाला याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. म्ह्णून भावी आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच घोकंपट्टी न करता नियमित अभ्यासावर भर द्या.
एक लक्षात घ्या, जर तुम्ही नियमित अभ्यास केला तर तुमचा अभ्यास परीक्षेआधीच पूर्ण झालेला असेल. त्यामुळे परीक्षेची चिंता मुळात तुम्हाला राहणारच नाही. त्यामुळे जिथं तुमचे मित्र अभ्यासात व्यस्त असतील, तिथं तुम्ही एकदम चिल्ल करत बसला असाल.
अभ्यास करण्याच्या प्रभावी पद्धती कोणत्या?
१) Notes चे Revision :
शाळा/कलासेस/कॉलेजमद्धे मिळालेल्या Notes चे शाळा/कलासेस/कॉलेज सुटल्यानंतर शक्य असल्यास वाचन करा. याला जास्त वेळ लागणार नाही, पण असे केल्याने शिकवलेला विषय अधिक समजण्यास तुमलाला मदत मिळेल.
ही Revision तुम्ही बसची वाट बघत असतांना किंवा घरी परततांना अगदी सहज करू शकता. एखादा विषय लक्षात ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
२) विषयाच्या मुख्य संकल्पना समजून घेणे :
अभ्यास करत असतांना Bullet Points समजून घेतले कि विषय समजून घेणे अवघड जात नाही. म्हणून क्लासमद्धे शिकवण्यात आलेल्या मुख्य संकल्पना काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही शंका असेल तर त्वरित त्या शंकेचे निरासरन शिक्षकांकडून करून घ्या आणि Text-Book मद्धे Note करून घ्या आणि नंतर विषय अधिक समजून घेण्यासाठी तुम्ही Books चा वापर करू शकता.
लक्षात ठेवा, प्रश्न विचारणे बुद्धिमान लोकाचे लक्षण आहे. चुकलात तरी चालेल. चुकण्यात काही गैर नाही, पण चूक लपवणे कधी-कधी फार महागात पडू शकते.
३) मोठ्याने वाचणे :
एखादा विषय तुम्हाला अवघड जात असेल तर त्याचे वाचन मोठ्याने करा. असे केल्याने वाचलेलं लक्षात ठेवण्यास मदत होते. पण मोठ्याने वाचत असतांना आजू-बाजूला कुणी नाही ना याची खात्री करून घ्या. नाहीतर विना-कारण लोक तुमची शंका घेतील.
मोठयाने वाचन केल्यानंतर आता हळू किंवा मनातल्या मनात त्या विषयाचे Revision करा.
४) अभ्यास आणि खरं आयुष्यातील दुवा समजणे :
तुम्ही जे काही शिकत आहात, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्याशी जोडून बघा. असे केल्याने एखाद्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्यात तुम्हाला मदत होईल. उदा. गणिताचा वापर हिशोब करण्यात करा, राज्यशास्त्राचा वापर, देशाची राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी करा. अशा पद्धतीने अभ्यास केल्याने, तुम्ही तो विषय कधीच विसरणार नाही.
५) नोट्स बनवणे :
एखाद्या विषयाचे वाचन केल्यानंतर लगेच त्या विषयावर Notes लिहून काढल्या पाहिजे. पण लक्षात घ्या केवळ Copy-Paste करणं म्हणजे Notes नव्हे, तर वाचन केलेल्या विषयाबद्दल, स्वतःच्या भाषेत लिहून काढणं म्हणजे Notes होय.
दर्जेदार Notes बनवण्यासाठी तुम्ही संबंधित Books आणि Internet चा वापर करू शकता. Notes लिहितांना तुम्ही विविध रंगांच्या Pens किंवा Markers चा वापर करू शकता, जेणेकरून तुम्ही Bore होणार नाही.
६) Online Tutorials चा वापर करणे :
प्रत्येक वेळी तुम्हाला क्लासमद्धे शिकवलेल्या गोष्टी समजतीलच असे नाही, आणि त्यात काहीच गैरही नाही. पण शक्यतोवर ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही, त्या शिक्षकांना त्वरित विचारा आणि आपल्या शंका दूर करा. जर विचारण्यात काही अडचण असेल तर मात्र तुम्ही Online Tutorials चा वापर करण्यास मोकळे आहात.
तुमच्या शंकांचे निरासरण करण्यासाठी तुम्ही YouTube, Study IQ Education, Unacademy अशा Online Platforms चा वापर करू शकता.
Hardwork नाही तर Smartwork करा :
१) स्वतःची Learning Style ओळखणे :
नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर केल्याने तुम्ही लवकर शिकता हे जाणून घ्या. उदा. तुम्ही Visual Learner आहात, म्हणजे पाहून तुम्ही शिकता किंवा तुम्ही Auditory Learner आहात, म्हणजे ऐकून तुम्ही शिकता किंवा तुम्ही Kinesthetic Learner आहात.
जर तुम्ही Visual Learner असाल तर मग तुम्ही महत्वाचा मजकूर Marker ने Highlight करू शकता, चांगल्या अभ्यासासाठी संलग्न विषयाशी संबंधित Documentary पाहू शकता, Mind Map पद्धतीचा वापर करूनही उत्तम अभ्यास करू शकता.
जर तुम्ही Auditory Learner आहात तर मग तुम्ही Notes मोठ्याने वाचून किंवा Audio Books च्या माध्यमातून अभ्यास करू शकता आणि जर तुम्ही Kinesthetic Learner आहात, तर तुम्ही चालत-चालत वाचन करू शकता किंवा चालता-चालता Audio Book ऐकू शकता.
२) Flash Card किंवा Diary चा वापर करणे :
केलेला अभ्यास जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही एका Diary मद्धे त्या विषयाचे Bullet Points लिहून काढू शकता किंवा इंटरनेटवरून ते Download करू शकता आणि त्याची Print काढून घेऊ शकता. पण एक लक्षात घ्या, स्वतः लिहून काढणे कधीही चांगले. कारण लिहीत संतांना सुद्धा तुमचा एक प्रकारे अभ्यासच होत असतो.
या Diary मद्धे तुम्ही इंग्रजी विषयातील अवघड शब्द, गणिताचे Formulae, इतिहासातील महत्वाच्या घटनांचे तारखा-सन ई. लिहून काढू शकता. प्रत्येक विषयासाठी वेगळी Diary केली तर ते उत्तमच! एक लक्षात घ्या, केवळ Diary बनवून चालणार नाही तर जेव्हा-केव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळेल, तेव्हा तिचे Revision तुम्ही करायलाच पाहिजे.
३) Mind Map तयार कारणे :
एक लक्षात घ्या, केवळ वाचन करून कोणताही विषय आपल्या लक्षात ठेवणं केवळ अवघड आहे. म्हणून Mind Map किंवा Chart तयार करणं कधीही योग्य. यामद्धे तुम्ही सुरुवातीला Title द्या, त्यानंतर त्या घटनेशी संबंधित इतर घटक Chart च्या माध्यमातून दाखवा. उदा. सन. १८५७ चा उठाव. त्यामद्धे त्याची प्रमुख कारणं, उठावाचे नेतृत्व, लढ्याचा शेवट ई. घटनांचा समावेश करू शकता.
त्याचबरोबर चित्राच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट देऊनही तुम्ही तो विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता.
४) वेळो-वेळी Tests घेणे :
स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी केवळ शालेय किंवा कॉलेजमधील Tests वर अवलंबून राहू नका, तर तुमच्या प्रत्येक अभ्यास सत्र म्हणजेच Study Session संपल्यानंतर किमान १५-२० मिनिटे राखून ठेवा आणि वाचलेल्या भागासंबंधित पुस्तकातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या भाऊ-बहिणीला किंवा मित्राला वाचलेल्या भागाशी संबंधित प्रश्न विचारायला सांगा.
प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न कारा. पण जर उत्तर येतच नसेल तर Guide चा वापर करायला लाजू नका आणि परत त्या भागाचे Revision करा. जेणेकरून तो भाग परत तुम्ही विसरणार नाही.
५) Group Study करणे :
एखादा अवघड विषय अगदी सहजपणे समजून घेण्यासाठी Group Study चे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे तुम्ही जे शिकलात ते तुमच्या Study Group सोबत Share करा. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. Group च्या ईतर Members नी जे काही वाचले आहे ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्यानी तुमचे आणि ईतरांचेही ज्ञान वाढण्यास मदत होईल.
एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढं ज्ञान वाटाल, तेवढंच तुमचं ज्ञानही वाढेल.
अभ्यास करतांना Motivate कसे राहाल?
१) Break घेणे :
Non-Stop अभ्यास करण्यापेक्षा, प्रत्येक अभ्यास सत्रानंतर म्हणजेच Study Session नंतर १०-१५ मिनिटांचा Break घेतला पाहिजे. या वेळेत तुम्ही पाय मोकळे करू शकता किंवा तुमच्या आवडत्या गाण्यावर Dance करू शकता. या सर्व Cardio Activities आहेत, ज्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होते आणि आपला मेंदू अधिक चांगल्या रीतीने कार्य करू लागतो. ज्याचा फायदा अभ्यासात तुम्हाला होईल.
सांगायचा उद्देश एवढाच कि तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो पण ज्यामुळे तुमचे मन विचलित होणार नाही अशाच गोष्टी तुम्हाला Break मद्धे करायच्या आहेत. आणि हो TV किंवा Video Game पासून चार-हात लांबच राहा. अर्थातच अभ्यास पूर्ण होई पर्यंत!
२) Healthy Snacks खाणे :
अभ्यास करतांना हलकासा नाश्ता केला पाहिजे. असे केल्याने तुमची Energy Level कमी होणार नाही आणि तुम्ही जास्त वेळेपर्यंत अभ्यास करू शकाल. नाष्ट्यामद्धे तुम्ही खालील घटकांचा समावेश करू शकता_
- फळं (सफरचंद/ द्राक्ष/ गाजर/ संत्री ई.)
- बदाम/ काजू/ शेंगदाणे
- Dark Chocolate
३) भरपूर झोप घेणे :
उत्तम कार्यपुर्तीसाठी, भरपूर झोप खूप महत्वाची असते. १४ ते १७ वयोगटातील व्यक्तींनी रात्री ८ तास झोप घेणे आवश्यक आहे, १८ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी रात्री ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुमची झोप पूर्ण झाली नाही तर अभ्यासातच नाही तर इतर कोणत्याच गोष्टीत तुमचे मन लागणार नाही. म्हणून चांगल्या अभ्यासासाठी पुरेशी झोप घेणं कधीही योग्य.
#InfoWorldMarathi #Study
0 Comments