InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            Coronavirus 
आल्यापासून अख्या जगाला एकाच गोष्टीची आतुरता लागलेली होती आणि ती म्हणजे COVID-19 ची Vaccine! आता Vaccine तर आली आहे पण त्याबद्दल खूप शंका-कुशंका अनेकांच्या मनात आहेत त्यासाठीच हा लेख!       


Vaccine आणि Vaccination म्हणजे काय?

                     

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Vaccine हा एक असा पदार्थ जो शरीरामद्धे गेल्यानंतर विशिष्ट रोगविरोधात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.
 Vaccine मुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा आजार टाळले जातात. 

            सामान्यतः Vaccines ह्या दंडामद्दे टोचून, तोंडावाटे किंवा नाकावाटे दिल्या जातात. उदा. अपंगत्व होऊ नये म्हणून पोलिओ Vaccine  तोंडावाटे दिली जाते, कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर रेबीज Vaccine, Injection द्वारे दिली जाते आणि Flu ची Vaccine (Nasovac-S Vaccine) नाकावाटे दिल्या जाते.

            एकदा का एखाद्या रोगावर Vaccine मिळाली कि मग सुरु होते Vaccination! लोकांना त्या-त्या रोगापासून वाचवण्यासाठी राबवण्यात येणारा सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग म्हणजेच Vaccination होय.


Vaccination का महत्वाचे आहे?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            Vaccine घेतल्याने केवळ आपणच सुरक्षित होत नाही तर आपल्या आजू-बाजूला राहणारे लोकही जे Vaccine घेण्यास असमर्थ आहेत तेही सुरक्षित होतात. कारण Vaccine घेतल्याने, तुमच्यापासून इतरांना आजार पसरण्याचा धोका अगदी शून्य होतो. 

            आजपर्यंत Diphtheria(घटसर्प), Tetanus(धनुर्वात), Pertussis(डांग्या खोकला), Influenza(शीतज्वर) आणि Measles(गोवर) सारख्या कमीत-कमी २० गंभीर आजारांवर Vaccines उपलब्ध आहेत आणि त्यांच्यामुळे दरवर्षी जवळपास ३० लाख लोकांचा जीव वाचवला जातो. म्हणून शक्यतोवर प्रत्येकानेच Vaccine घेणे गरजेचे ठरते.  


Vaccine मद्धे कोणते घटक असतात?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            खरं तर Vaccine मद्धे कोणते घटक समाविष्ठ आहेत त्यावरच ती किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे सांगता येते. Vaccine मद्धे प्रामुख्याने ४ घटक आढळतात_

  • The Antigen : हा घटक Virus चा मेलेला किंवा त्याचा कमजोर भाग असतो. हा घटक आजार ओळखण्यासाठी आणि भविष्यात परत हा आजार झाल्यास, त्याच्याशी लढण्यासाठी आपल्या शरीराला Train करतो. 
  • Adjuvants : हा घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. यामुळे Vaccine अधिक चांगल्याप्रकारे काम करते. 
  • Preservatives : हा घटक Vaccine ला कार्यरत ठेवण्यासाठी मदत करतो. आणि 
  • Stabilisers : हा घटक  Vaccine चे रक्षण करण्याचे काम करतो.
   

Vaccine ची Test कशी केली जाते?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            सर्वात आधी 
Experimental Vaccine ही उंदीर,माकड यांसारख्या प्राण्यांवर Test केल्या जाते आणि सकारात्मक परिमाण दिसून आल्यानंतरच तिची Human Trial घेतली जाते. जी तीन Phases मद्धे  होते. Phase 1, Phase 2 आणि Phase 3.

  • Phase 1 मद्धे अगदी मोजक्याच Volunteers ला ही Vaccine दिल्या जाते आणि त्यानंतर Immune Response मिळतो कि नाही, याचे निरीक्षण करण्यात येते. या Phase मद्धे Doses ची संख्या आणि Volunteers ची सुरक्षितता याकडेही विशेष लक्ष देण्यात येते. 
  • Phase 2 मद्धे १०० एक Volunteers ला Vaccine दिल्या जाते आणि त्यानंतर तिचे Side Effects, Immune Response याचे अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केल्या जाते. या Phase मद्धे, Data Collection कडे विशेष लक्ष दिल्या जाते. Phase 2 मद्धे काहींना Vaccine दिल्या जाते तर काहींना नाही आणि शेवटी या दोन्ही Groups च्या Results ची तुलना करून, Vaccine किती सुरक्षित आहे हे निश्चित केल्या जाते.
  • Phase 3 मद्धे १००० Volunteers ला Vaccine दिल्या जाते. या Trial मद्धे Phase 2 प्रमाणेच काहींना Investigational Vaccine दिल्या जाते तर काहींना नाही दिल्या जात. या दोन्ही Groups च्या Results ची तुलना करून Data Collect केला जातो आणि संबंधित आजारावर ही Vaccine किती परिणामकारक राहील, याचा निर्णय घेतल्या जातो.

            एकदा का Vaccine मिळाली कि तिच्यामद्धे बदल करण्याची क्षमता, सुरक्षितता आणि शेवटी तिच्या निर्मितीवर भर दिल्या जातो आणि शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ती सामान्य जनतेसाठी खुली केली जाते. 


Vaccine काम कशी करते?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            जेव्हा आपण Vaccine घेतो तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि Vaccine मिळून शरीराचे आजारापासून रक्षण करतात. Vaccine आपल्या शरीराला Virus शोधण्यास मदत करते, Virus विरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या Antibodies तयार करते आणि आणि त्या Virus व आजाराला आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला लक्षात ठेवण्यात मदत करते आणि भविष्यात हाच आजार होण्याची शक्यता असल्यास, आजार होण्याआधीच Vaccine , Virus चा खात्माही करते. 

            एखादा आजार झाल्यावर त्यावर Treatment करून बरं होता येतं पण Vaccine मुळात आपल्याला तो आजारच होऊ देत नाही. 


कोण Vaccine घेऊ शकतं?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            जवळपास सर्वच जण Vaccine घेऊ शकता पण जर तुम्ही गंभीर आजारी असाल किंवा तुम्हाला Vaccine मद्धे सामावलेल्या घटकांची Allergy असेल किंवा Vaccination च्या दिवशी तुम्हाला ताप असेल तर Vaccine घेणे टाळा आणि तसे Doctors ना सूचित करा जेणेकरून ते तुम्हाला पर्यायी मार्ग सुचवतील.  


Vaccine Safe आहे कि नाही हे कसे कळेल?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            वर्तमानकाळात ज्या काही Vaccines जगामद्धे उपलब्ध आहेत त्या सर्वच Phase 1, 
Phase 2 आणि Phase 3 च्या कडक निरीक्षणातून गेल्या आहेत आणि ज्या काही नवीन Vaccines बनवल्या जात आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा हा 3 Phases चा नियम लागू होतो. ज्या Vaccine ने या तीनही Phases पूर्ण केल्यात तीच Vaccine, सुरक्षित आहे असे समजावे.


Vaccine घेतल्याने काही Side Effects होतात का?

                     

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            Vaccine मद्धे संबंधित 
रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो, त्यामुळे कुठलाही आजार होत नाही किंवा जीवितास काही धोका निर्माण होत नाही. म्हणून सहसा Vaccines ह्या सुरक्षितच असतात. 

            पण कधी-कधी काही Minor Side Effects आपल्याला आढळून येऊ शकतात. जसे, Vaccine घेतलेला दंड दुखणे किंवा साधा ताप येणे ई. पण यांत काही घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ते अगदी Short Period साठी असतात आणि त्यानंतर ते ठीक होतात. 

            पण फार Rare Situation मद्धे Serious Side Effects ही होऊ शकतात, पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे. आणि तसही Vaccine पेक्षा आजारच जास्त जीवघेणे असतात, नाही का? 


Vaccine घेतल्यानंतर काही Side Effect झाल्यावर काय होते?

                   

InfoWorldMarathi COVID19 Vaccine

            सहसा असं होत नाही पण यदाकदाचित असे झालेच तर लगेच Vaccination थांबवले जाते आणि संबंधित Vaccine काही कालावधीसाठी Suspend केल्या जाते आणि Vaccine सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतरच तिचा पुन्हा वापर करण्यात येतो. 



#InfoWorldMarathi   #COVID19Vaccine


Video :