कोरोना व्हायरस आणि त्यातही लॉकडाउनमुळे आज अनेकांचे व्यवसाय बंद पडत आहेत किंबहुना बंद पडले आहेत, तर अनेकांनी त्यांचे जॉब्स गमावले आहेत. अशात घरी बसून मोबाईल किंवा कंप्युटरवर टाईमपास करण्यापेक्षा तुम्ही त्याद्वारे अगदी घरबसल्या पैसे कमवू शकता. ते ही कुठलेही इन्व्हेस्टमेंट न करता!

            अर्थातच त्यासाठी काही खास स्किल्स तुमच्यामद्धे असणे आवश्यक आहे. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण या स्किल्स अगदी सोप्या आणि सहज शिकण्याजोग्या आहेत. फक्त तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल.

१) Websites, Apps किंवा Software Review : 

           

InfoWorldMarathi

            जर तुम्हाला नवीन गोष्टींबद्दल नेहमी कुतूहल वाटत असेल, किंवा एखाद्या प्रॉडक्टमधील त्रुटी आणि त्याचबरोबर तो प्रॉडक्ट अधिक दर्जेदार कसा बनवता येईल हे स्वतःच्या शब्दांत मांडता येत असेल तर तुम्ही Websites, Apps, किंवा Software चे Review देऊन सहज पैसे कमवू शकता. 

           

InfoWorldMarathi

            तुम्हाला फक्त 
User Testing या Website ला Visit करायचं आहे, आणि ज्या प्रॉडक्टचे तुम्हाला Review करायचे आहे, त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. अर्थातच तुम्ही जो प्रॉडक्ट Review करणार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्या जाते, ज्याचा वापर करून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देऊ शकाल. 

            तुम्हाला एका Review साठी किमान $10 (Rs.740)  दिले जातात. तुम्ही जेवढे जास्त Reviews देसाल, तेवढा जास्त पैसा तुम्ही कमवू शकाल. अगदी घरबसल्या!

           

InfoWorldMarathi

            जर तुम्हाला 
Software बद्दल उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही Software Judge या Websites वर Software चे Review देऊनही पैसे कमवू शकता. 

२) Mobile Photography :

           

InfoWorldMarathi

            जर तुम्ही Professional Photographer असाल किंवा केवळ छंद म्हणून तुम्ही Photography करत असाल, तर तुम्ही तुम्ही काढलेल्या फोटोंचा वापर घरबसल्या पैसे कमावण्यासाठी करू शकता. 

            

InfoWorldMarathi

            त्यासाठी Foap या Website ला Visit करा, आणि तुम्ही काढलेले फोटो किंवा व्हिडिओ त्या Website वर Upload करा. जर कुणाला तुमची Photography आवडलीच तर ते तुमचे फोटो विकत घेतीलच आणि होऊ शकते तुमचे काम पाहून कदाचित भविष्यात एखादा Project ही तुम्हाला देतील. 

३) Online Tutor :

           

InfoWorldMaarathi

            जर तुम्ही शिक्षक असाल किंवा एखाद्या विशिष्ट विषयांत पारंगत असलेले विद्यार्थी असाल तर तुम्ही Online शिकवणी घेऊन चांगले पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही Tutor Me, Chegg Tutors, Tutor.com, Yup, Cambly ई. Websites चा वापर करू शकता. 

४) Translation Work : 

               

InfoWorldMarathi

            जर तुम्ही बहुभाषिक असाल आणि तुम्हाला अवगत असलेल्या भाषांचे उत्तम ज्ञान तुम्हाला असेल तर केवळ एका भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. Upwork, People Per Hour, SDL, Gengo, Pro Translating, Translators Base ई. Websites चा वापर तुम्ही यासाठी करू शकता. 

५) Freelancing :

           

InfoWorldMarathi

            जर तुम्ही लेखक, ग्राफिक डिजाइनर, शिक्षक, डेव्हलपर असाल तर तुम्ही तुमच्या स्किल्सच्या जोरावर Freelancing द्वारे घरबसल्या पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही Fiverr, Freelancer, Upwork ई. Websites चा वापर करू शकता.

६) Online Course :

           

InfoWorldMarathi

            Knowledge Is Power असे म्हणतात. ते अगदी खरं आहे. आणि याच ज्ञानाचा वापर करून तुम्ही स्वतःचा Online Course बनवून अमाप पैसे कमवू शकता. 

           

InfoWorldMarathi

            त्यासाठी तुम्ही 
एखाद्या विषयांत पारंगत असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही त्या विषयांवर एक दर्जेदार 
Online Course बनवायचा आहे आणि तो स्वतःच्या Website वर किंवा App वर Upload करायचा आहे. तुमचा Course जेवढा लोकप्रिय असेल, तेवढा पैसा तुम्ही कमवू शकाल. किंवा तुमचा Course तुम्ही Udemy ला विकून चांगले पैसे कमवू शकता.  

७) Influencer :

            

InfoWorldMarathi

            जगातील 
सर्वात मोठे Influencer जर कोणी असतील तर ते आहेत अभिनेता/अभिनेत्री, क्रिकेटर्स, गायक/गायिका! या सर्वांना अगदी करोडोंनी लोक फॉलो करत असतात. त्यामुळे एक Influencer म्हणून ते अमाप पैसे कमवत असतात. 

           

InfoWorldMarathi

            एक लक्षात ठेवा, 
आज-काल करोडोंनी फॉलोवर्स असणे गरजेचे नाही (अर्थात असतील तर उत्तमच आहे) तुमचे ठीक-ठाक फॉलोवर्स असले तरी तुम्ही चांगला पैसे कमवू शकता. या साठी तुम्ही YouTube, Instagram सारख्या माध्यमांचा वापर करू शकता. 
            तुमचे जेवढे जास्त फॉलोवर्स असतील, तेवढे तुम्हाला Sponsors मिळतील. आणि जेवढे Sponsors तुम्हाला मिळतील तेवढे जास्त पैसे तुम्ही कमवू शकाल. 

८) Affiliate Marketing :     

           

InfoWorldMarathi

            Online पैसे कमावण्यासाठी Affiliate Marketing हा सर्वात लोकप्रीय मार्ग मानला जातो. जर तुमच्यात काही प्रमाणात जरी Marketing Skills असतील तर तुम्ही या माध्यमाद्वारे चांगले पैसे कमवू शकता. 

           

InfoWorldMarathi

            Affiliate Marketing तुम्ही एका किंवा त्यापेक्षा जास्त कंपण्यांसाठी करू शकता. या 
कंपण्यांच्या Website वरून तुम्हाला ज्या प्रॉडक्टची मार्केटिंग करायची आहे त्याची लिंक कॉपी करायची आहे आणि बस ती तुमच्या Website वर किंवा तुमच्या Facebook Page किंवा Group वर Share करायची आहे. तुमच्या त्या लिंक वरून जेवढ्या लोकांनी तो प्रॉडक्ट खरेदी केला, त्याचे कमिशन तुम्हाला दिल्या जाते.              

९) Blogging :         

           

InfoWorldMarathi

            Online पैसे कमावण्याचा हा एक सर्वात प्रभावी मार्ग आहे. जर तुम्हाला उत्तम प्रकारे शब्दांची मांडणी करता येत असेल तर तुमच्यासाठी हे माध्यम घरबसल्या पैसे कमावण्यासाठी योग्य आहे. 

            

InfoWorldMarathi

            तुम्हाला फक्त ज्या विषयांत आवड आहे असा विषय निवडायचा आहे. उदा. आरोग्य, मनोरंजन, कूकिंग किंवा ईतर कोणताही विषय जो तुम्हाला मनापासून आवडतो. त्यानंतर तुम्हाला .com किंवा .in सारखे Domain आणि Hosting खरीदी करायची आहे, आणि तुम्ही निवडलेल्या विषयांबद्दल दर्जेदार लिखाण करायचं आहे. 

            एकदा का तुमच्या Blog ला Google Adsense Approval मिळाले कि मग तुम्ही अमाप पैसे कमवू शकता.

१०) YouTube :              

           

InfoWorldMarathi

            हा सुद्धा Blogging प्रमाणे Online पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग आहे, फरक इतकाच कि Blogging मद्धे लिखाणाद्वारे पैसे कमवले जातात तर YouTube मद्धे व्हिडिओ माध्यमाचा वापर करून पैसे कमवले जातात.  

            

InfoWorldMarathi

            जर तुम्हालाही एखाद्या विषयाबद्दल भरपूर ज्ञान असेल मग ते राजकीय, सामाजिक, मनोरंजनात्मक किंवा कूकिंगबद्दल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून सुरुवातीला तुमच्या जवळील Android Mobile ने सुद्धा व्हिडिओ बनवून 
YouTube वर Upload करू शकता.  

           

InfoWorldMarathi

            एकदा का तुमचे 1000 Subscribers आणि 4000 तासांचा Watch Time पूर्ण झाला कि मग तुमच्या 
YouTube Channel वर Google Adsense द्वारे जाहिराती दाखवायला सुरुवात होईल आणि तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकाल.   


#InfoWorldMarathi