कोरोना व्हायरसला येऊन आता १ वर्ष उलटून गेलय. मानवी जीवनात तांडव करणाऱ्या या व्हायरसने अगदी सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वानांच आपल्या विळख्यात घेतले आहे. महामारी कोणतीही असो ती माणसांचं सामान्य जीवन विस्कळीत करतेच; म्हणून अशा गंभीर परिस्थितीतही निरोगी आणि सुखी जीवन जगण्याच्या ह्या काही टिप्स.
१) कमीत कमी बातम्या पाहा/वाचा :
कोरोनाच्या या भीतीदायक वातावरणात देश-विदेशांत किंवा तुमच्या सभोवताली घटणाऱ्या घटनांबद्दल अपडेट राहणं खूप आवश्यक आहे. पण त्यासाठी तुमचा बहुतांश वेळ टीव्ही किंवा मोबाईलवर बातम्या पाहत घालवणे योग्य नाही. त्याने केवळ तुमच्या मनात भीतीच निर्माण होईल.
म्हणून दिवसातून केवळ दोनदाच म्हणजे सकाळी आणि संध्याकाळ बातम्या पहा जेणेकरून तुम्ही अपडेटही राहाल आणि तुमचे मनही शांत राहील.
२) आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या :
कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग म्हणजेच १-१.५ मीटर अंतर ठेवणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक क्षमताही मजबूत ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण यदाकदाचित कोरोना विषाणूने तुमच्या शरीरात प्रवेश केलाच तर त्याच्याशी लढा देण्यासाठी तुमचे शरीर सज्ज असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी तुम्ही पौष्टिक आहाराचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
पौष्टिक आहारात तुम्ही प्रथिने, भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य यांचा सामावेश करू शकता. उदा. सकाळी नाश्त्यामद्धे केळी आणि बदाम किंवा ऑम्लेट खाऊ शकता, दुपारच्या जेवणात चिकनचा समावेश करू शकता. सोबत गाजर, काकडीही खाऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणात मासे खाऊ शकता सोबत सॅलड पण ठेवा जेणेकरून जीवनसत्वही तुम्हाला मिळतील.
हे ही वाचा : “या” ७ टिप्स तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतील!
३) दररोज ३० मिनिटे व्यायाम करा :
कोरोनाच्या बातम्या पाहून किंवा नवीन कोरोना रुग्नांची संख्या पाहून किंवा विस्कटलेली वैद्यकीय सेवांचे व्हिडिओ पाहून भीती वाटणे आणि त्यामुळे तणाव निर्माण होणे अगदी साहजिक आहे. म्हणूनच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा एंडोर्फिन्स (Endorphins) नावाचे केमिकल तुमचे शरीर निर्माण करते, जे शारीरिक किंवा मानसिक तणाव कमी करण्यात खूप महत्वाची भूमीका बजावते. म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी दररोज न चुकता ३० मिनिटे व्यायाम हा केलाच पाहिजे.
व्यायामामद्धे तुम्ही तुमच्या घरासमोरील अंगणात किंवा गार्डनमद्धे पाय मोकळे करू शकता, एखाद्या गाण्यावर डांस करू शकता, लंजेस (Lunges), स्क्वाट्स (Squats) आणि जंपिंग जॅक्सही (Jumping Jacks) करू शकता किंवा तुम्ही १५-३० मिनिटे मेडिटेशनही करू शकता.
त्याचबरोबर तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही आपले छंद जोपासू शकता, तुमच्या भावना एखाद्या डायरीमद्धे लिहून काढू शकता, फेसबुक किंवा ईतर अँप्सवर नवीन लोकांशी मैत्रीही करू शकता.
४) मित्र परिवाराशी संवाद साधा :
सध्याचा काळ जरी भीतीदायक असला तरी ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींशी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत गप्पा मारू शकता. जेणेकरून तुमचे मनही हलके होईल आणि तुम्ही तणावमुक्तही राहाल.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून किंवा मित्रांपासून दूर राहत असाल तर त्यांच्याशी व्हाट्सअँप सारख्या माध्यमांद्वारे चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉल करून मन मोकळ्या गप्पा मारू शकता. व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्ही स्काईप (Skype), झूम (Zoom), फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) ई. वापर करू शकता.
५) शक्य असल्यास गरजूंना मदत करा :
कोरोनामुळे अनेकांनी आपले जॉब्स गमावले आहेत किंवा अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कुण्या गरजुची आर्थिक मदत करा किंवा त्यांना अन्नदान करा किंवा ईतर कुठलीही मदत जी तुम्हाला शक्य असेल ती नक्की करा. एक लक्षात ठेवा तुमची छोटीशी मदत कुणाचा तरी जीव वाचवू शकते.
#InfoWorldMarathi
0 Comments